About us
आपली महाराष्ट्रीयन संस्कृती आणि पारंपारिक खेळ भारतभरच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय ठरत आहेत. म्हणूनच आमचे ‘मंगळागौरी’चे खेळ आता फक्त श्रावण महिन्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत.
गेल्या सहा वर्षांपासून गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि सीमान्त पूजनादिवशीसुद्धा आम्हाला मागणी येत आहे. एकसष्ठी, पंचाहत्तरी तसेच लग्नाचा सुवर्ण महोत्सव अशा सेलिब्रेशनसाठीसुद्धा आमच्या या खेळांना आवर्जुन बोलवणे आहे.
मग लग्नानंतर ‘मंगळागौर’ झाली की डोहाळे जेवणासाठीही कार्यक्रम द्या असा आग्रह होवू लागला होता. म्हणून संस्कार श्री ग्रुपनी डोहाळे जेवणाचीही थीम बसवली आहे. तसेच आपल्या बाळाचे गोड कौतुक करावे असे आईबाबांना वाटणे साहजिकच आहे म्हणूनच बारसे आणि वाढदिवस याचा स्वतंत्र कार्यक्रम ही तर संस्कार श्री ग्रुपची खासियतच!. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी व पुण्यात अनेक ठिकाणी त्याचे सादरीकरणही झाले आहे. ‘मंगळागौरी’च्या खेळा प्रमाणेच या कार्यक्रमालाही लोकांची पसंती व कौतुक मिळत आहे. ज्या मुलीचं डोहाळ जेवण तिच्याच बाळाच्या बारशासाठीही आग्रह होतोय. ही आमच्या ग्रुपच्या कार्यक्रमाला मिळणारी सर्वात मोठी पावती आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून आपणा सर्व रसिक मंडळींशी संपर्क साधताना खूप आनंद होत आहे. तुम्हाला सर्वांनाही आमचे हे कार्यक्रम पहाण्याची व आम्हाला बोलावण्याची इच्छा झाली असणार…! म्हणूनच संपर्कासाठी आमचे फोन नंबर आणि वेबसाईट खाली देत आहोत.
सोनाली – ९५०३४६००२१. सुनंदा -९८९०९०१६३६.
संस्कार जन्मापूर्वीच सुरू होतात…
1. गर्भसंस्कार.. डोहाळजेवण..
2. जन्म संस्कार.. बारसं/नामकरण..
3. जन्मदिन संस्कार.. पहिला वाढदिवस ते एकसष्ठी/पंचाहत्तरी.
4. आठव्या वर्षी…. मुंज/व्रतबंध सोहळा
5. विवाह संस्कार.. हळद.. मेहंदी..
6. मंगळागौर संस्कार.. श्रावणातल्या मंगळवारी
7. हे सर्व आणि असेच इतरही सण संस्कार.. हौस-मौज.
8. थाटात साजरे करण्यासाठी एकच नाव
9. “संस्कार श्री”
10. नवं नाव… नवा साज.. पण नातं मात्र तेच पूर्वीचं… आपुलकीचं…
11. जपू या..कायम सोबत राहू या..
त्यासाठी आमची वेबसाईट लक्षात ठेवू या…mangaldohale.com
Gallery